गडावरील प्रमुख दैवते
१ श्री स्वयंभू महादेव मंदिर
आज आपण श्री क्षेत्र संस्थान नारायण गड येथे दर्शनास गेलो असता आपणास मंदिराच्या उत्तर बाजूस पूर्वेकडे तोंड असलेले जे महादेवाचे मंदिर दिसते तेच स्वयंभू महादेव मंदिर होय. यास स्वयंभू म्हणण्याचे कारण म्हणजे यातील शिवलिंगाची स्थापना कोणीही केलेली नसून ती आपोआप निर्माण झालेली आहेत.
हे मंदिर एका सहा गुणीले नऊ फुट आकाराच्या शिळे भोवती बांधण्यात आलेले आहे. याचा विशेष चमत्कार असा कि या शिळेवर दर बारा वर्षांनी एक नवीन शिवलिंग उदयास येते. पूर्वीच्या शिवलिंगांची वाढ होते. या शिळेवर आतापर्यंत एकूण छत्तीस ३६ शिवलिंगाची निर्मिती झाली असून त्या सर्वाची वाढ सुरु आहे. म्हणजेच हे देवस्थान चारसे बत्तीस (४३२) वर्षा पासून आहे निश्र्चित होते. दर वर्षी कार्तिक शु. १५ पौर्णिमेस येथे मोठी यात्रा भरते ती त्रिपुरारी पोर्णिमा असते त्या दिवशी भगवान शंकराने त्रिपुर नावाच्या दैत्याचा वध केला. त्या निमीत्ताने आनंद उत्सव म्हणून हि यात्रा भरते पुढे आठ दिवस सुरु असते.
२ श्री विठ्ठल रखुमाई मंदिर
स्वयंभू महादेव मंदिराच्या दक्षिणेस विठ्ठल रखुमाई मंदिर आहे. येथील मूर्तीची प्राणप्रतिष्ठा मित्ती माघ शु. १३ शके १७१५ या साली स्रि. नागात नारायण महाराज यांनी केली त्यास आज दोनशे वीस (220) वर्ष पूर्ण झाली आहेत. या मंदिराच्या बांधकामाचे वैशिष्ट्य असे आहे कि, बाहेरील मोठ्या दरवाज्यासह एकूण पाच दरवाजे एका सरळ रेषेत बांधलेले आहेत. त्यामुळे सकाळी उगवत्या सूर्याचे पहिले किरण श्री विठ्ठलाच्या मुखावर पडते.
३ श्री.नगद नारायण महाराज समाधी
श्री. विठ्ठल रखुमाई मंदिराच्या समोर उत्तरे कडे तोंड करून जे मंदिर आहे. तेच श्री. नगद नारायण महाराज समाधी मंदिर होय. यात एक मोठी समाधी आहे त्यात मध्यभागी नगद नारायण महाराजाची, पश्चिमेस महादेव महाराजाची आणि पूर्वेस शेटीबा उर्फ दादासाहेब महाराज यांची अशा तीन समाध्यांची मिळून एकच समाधी बांधलेली आहे.
जर एखाधा भाविक भक्ताने श्रध्दा युक्त निष्ठेने अंत:करण पूर्वक प्रार्थना करून आपली प्रापंचिक अडचण दूर करण्याची विनंती नगद नारायण महाराजांना केली तर ती दूर होते असा अनेकांचा अनुभव आहे.
श्री. नगद नारायण महाराजांच्या समाधी मंदिराच्या पूर्वेस अनुक्रमे गोविंद महाराज, नरसू महाराज, महादेव महाराज (दुसरे), माणिक महाराज आणि महादेव महाराज (तिसरे) यांची लहान लहान समाधी मंदिर आहेत.
या सर्व देवस्थानाचे एकच मोठे विशाल मंदिर बाहेरून दिसते. ते सर्व हेमाडपंथी पध्दतीचे दगडी असून एकूण (४०) चाळीस खन बांधकाम झालेले आहे.