देणगी

आवाहन :-
विश्वाच्या कल्याणार्थ सतत प्रयत्नशील असलेल्या संतांचे कार्य हे अत्यंत महत्वपूर्ण आहे.त्यांनी आपल्या आचार विचारातून समाज मन घडविले.अनेक जणांना सन्मार्गाला लावले,अंधश्रध्देचा तिरस्कार करुन डोळस भक्ती करण्यास सांगितले.संपूर्ण विश्व हे एका परमेश्वराचेच अंश असून त्यात स्त्री पुरुष उच नीच असा भेद भाव नाही असा संदेश दिला.त्यांनी दिलेला विचार,त्यांनी अनुसरलेला आचार हा आपल्यासमोर आदर्श जीवनाचा वस्तुपाठच आहे. या गोष्टींचा फायदा बहुजनांस व्हावा या दृष्टीने त्याचा प्रसार प्रचार आवश्यक आहे.खरेतर ते आपणा सर्वांचे नैतिक कर्तव्यच आहे. यासाठी संस्थानाने वैद्यकीय उपक्रम,वारकरी शिक्षणसंस्था,गोशाळा,अन्नदान यासारखे चांगले उपक्रम हाती घेतलेले आहेत आणि हे उपक्रम असेच कायम सुरु राहून त्याचा सर्वांना जास्तीजास्त लाभ व्हावा.गडाच्या जीर्णोद्धारा चे तसेच नवीन बांधकाम हाती घेण्यात आलेले आहे.यासाठी आपणा सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे.

आपण खालील प्रकारे मदत करु शकता
१) आर्थिक देणगीच्या स्वरुपात.
२) गरजेच्या वस्तुच्या स्वरुपात.
३) ग्रंथ साहित्य देवून.
४) गडाच्या जीर्णोद्धार(बांधकाम)साठी.
५) या कार्यात प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष सहभागी होऊन.

टीप- वरील कोणत्याही मदतीसाठी खालील पत्त्यावर संपर्क साधा.
संपर्कसाठी पत्ता :
श्री क्षेत्र नारायणगड संस्थान ,
तालुका शिरूर जिल्हा बीड,
पीन – ४१४२०५.
इ मेल आयडी – shreenarayangad@gmail.com