Images

गोशाळा उपक्रम

तेहतीस कोटी देवांचा ‌वास ज्यामध्ये असतो.कुळधर्म-कुळाचाराला नैवेद्याचे वेगळे पान जिच्यासाठी वाढले जाते.वसुबारस हा स्वतंत्र दिन ज्यासाठी साजरा केला जातो.अशा गायींचा सांभाळ करून पालनपोषण साठी नारायण गड संस्थाना तर्फे गोशाळा चालवली जाते. आज या गोशाळे मध्ये २०० गाई आहेत . अध्यात्मात गायीला अनन्य साधारण महत्त्व आहे. यामुळे आजही गायींचे पूजन करण्यात येते. गायींमधील काम करण्याची क्षमता संपल्यावर तसेच गायींना व्याधी झाल्या असल्या तर अनेकांतर्फे त्यांना मोकळ्यावर सोडून देण्यात येते किंवा गो-शाळेत दान दिले जातात. अशा गायींवर उपचार करणे, त्यांचे पालनपोषण करण्याची व्यवस्था संस्थाना तर्फे केली जाते