शैक्षणिक कार्य

मोफत वसतीगृह :
सरस्वतीचा वरदहस्त लाभल्यावर मानवाचा उद्धार होतो हे लक्षात घेऊन संस्थानने अनेक उपक्रम राबविले आहेत. सुशिक्षीत तसेच संस्कारक्षम पिढी घडविण्यासाठी संस्थानव्दारा संचालीत गरीब मुलांना शिक्षण घेता यावे म्हणून त्यांनी गडावर इयत्ता पाचवी ते दहावी पर्यंतच्या शिक्षणाची सोय केली. जे विधार्थी अत्यंत गरीब आहेत त्यांच्यासाठी संस्थानामार्फत मोफत वसतीगृह चालू केले.

वारकरी शिक्षण संस्था :
संत वाङमयातील तत्वज्ञानाचा प्रचार व प्रसार व्हावा, जनमानसांमध्ये भागवत भक्तीची, निती धर्माची, ज्ञानज्योत तेवत राहून समाजाला स्वदेश व स्वभाषा यांच्या कर्तव्याची जाणीव होवून समाज व्यसनमुक्त व्हावा व राहावा, बंधुभाव, सद्प्रवृत्ती नांदावी. पारमार्थीक संस्कार घडून संस्थेत शिक्षण घेतलेल्या प्रवचनकार, कीर्तनकार त्यांनी ह्याच माध्यमातून लोकांचे आत्मकल्याण साधावे ह्याच सद्उद्देशाने वारकरी शिक्षण संस्था स्थापन करण्यात आली आहे.श्री नगद नारायण महाराजांनी जोपासलेला अध्यात्ममार्ग नजरेसमोर ठेवून संस्थानच्या आध्यात्मिक क्षेत्रातील सेवाकार्याची वाटचाल होत आहे. वारकरी संप्रदायाची जोपासना व जडणघडण करीत असतानाच संस्थानद्वारा वारकरी शिक्षण संस्थेसारख्या अद्वितीय अभ्यासक्रमातून ‘उद्याचा वारकरी‘ घडविला जात आहे. यासाठी आवश्यक असलेले सर्व प्रयत्न आणि त्यासाठी सर्वतोपरी साहाय्य याद्वारे संस्थानचे आध्यात्मिक कार्य जोमाने साकार झाल्याचे दिसून येते.