व्यसनमुक्त समाज

व्यसनमुक्त समाज :-
गडावरील महंत श्री शिवाजी महाराज आपल्या रोजच्या कीर्तनात आणि कीर्तनानंतर केलेल्या उपदेशाच्या, आवाहनाच्या सादेला प्रतिसाद देत लाखो लोक त्यांच्या हातून पंढरीच्या पांडुरंगाची पवित्र तुळशीमाळ आपल्या गळ्यात धारण करत आहेत.रोजच्या कीर्तनानंतर तो एक कीर्तनाइतकाच महत्वाचा कार्यक्रम ठरत आहे.कारण त्या माळेच्या पवित्र बंधनामुळे व्यसन सोडून चांगले जीवन जगण्याचा पक्का निश्चय करण्यास गुरुकृपेने मन दृढ राहते.परिणाम संपूर्ण कुटूंबच सात्विक जीवन जगु लागते. याचा अनुभव आतापर्यंत लाखो लोकांनी घेतलेला आहे व त्यांचे कुटूंब आज सुखी संसार करत आहे. कारण तुळशीमाळ घातल्यानंतर पुढील नियम पाळावेच लागतात.

• वारकरी संप्रदायाची तुळशीमाळ घातलेल्यानीं मांस-मच्छी, गुटखा खाऊ नये, दारु पिऊ नये, जुगार खेळू नये. पुरुष असेल तर परस्त्री रुक्मिणीमातेसमान व स्त्री असेल परपुरुष श्री पांडुरंगासमान मानावा.

• घातलेली माळ कधीही काढू नये. माळ गळ्यात असल्याशिवाय अन्नग्रहण करु नये. माळ तुटली अथवा खराब झाल्यास दुसरी घालावी पण एकदा घातल्यावर ती काढू नये.पण पंधरा दिवसाचे एकादशीला ( शुध्द,वद्य) उपवास करावा.