Images

संकेतस्थळाविषयी

” श्री क्षेत्र नारायणगड संस्थान ” हे एक वारकरी सांप्रदायाचा प्रसार करणारे व महाराष्ट्रातील धाकटी पंढरी म्हणून ओळख असलेले संस्थान आहे.संस्थानाची स्थापना सुमारे २२० वर्षापुर्वी श्री संत नारायण महाराज यांनी केली आहे.सुमारे २२० वर्षाचा इतिहास असलेल्या या जुण्या संस्थानाच्या कार्याची अधिकृत माहिती जगभरातील वाचकांना,अभ्यासकांना,भाविकांना व्हावी या उद्देशाने www.narayangad.com या संकेतस्थळाचे उदघाटन श्री महंत शिवाजी महाराज मठाधिपति श्री क्षेत्र नारायणगड यांच्या हस्ते तसेच दिलीप गोरे,महादेव तुपे,भीमराव मस्के,जनार्धन शेळके आदी विश्वस्त व श्री ह.भ.प. संभाजी महाराज,उत्कर्ष गवते,संतोष काशिद यांच्या उपस्थितीत दि.१०/११/२०१४ रोजी श्री क्षेत्र नारायणगड संस्थान येथे करण्यात आले

संकेतस्थळाची मूळ संकल्पना श्री संतोष काशिद यांची असून त्याचे काम वै.गुरुवर्य महंत महादेव बाबा व आताचे मठाधिपती श्री महंत शिवाजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली पुर्ण करण्यात आले आहे. या संकेतस्थळाचे तांत्रिक नियोजन BLOSSOM INFOTECH या मुंबई स्थित सुभाष काशिद व संतोष काशिद यांच्या मालकीच्या कंपनीने सेवाभावी वृत्तीने केले आहे व करीत आहे. सदरील संकेतस्थळामध्ये संत श्री नारायण महाराज यांच्यापासून ते आताचे मठाधिपती श्री महंत शिवाजी महाराज यांच्यापर्यंत सर्वांच्या सामाजिक व धार्मिक कार्याची माहिती तसेच संस्थानाचा इतिहास,बांधकाम,सुरू असलेले वैद्यकीय उपक्रम,वारकरी शिक्षण संस्था, गोशाळा,अन्नदान यासारखे चांगले उपक्रमाची सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे.
गडावरील दैनंदिन उपक्रमाची व चालू घडामोडीची माहिती भाविकांना Facebook,Twitter,Blog या Social Media च्या account वर देत आहोत जेणेकरून जगभरातील भाविकांना याची नोंद प्रत्यक्ष गडावर न येता घेता यावी.या link खालीलप्रमाणे आहेत
https://www.facebook.com/shreeNarayangad

https://twitter.com/shreenarayangad

http://narayanagad.blogspot.in/

Download Android Mobile App

संकेतस्थळाच्या बांधणीपासून ते उदघाटना पर्यत अनेकांचे सहकार्य लाभले.श्री उत्कर्ष गवते,मोहन गवते सर, लोंढे सर यांनी नारायण गड आणि परिसराची छायाचित्रे व जुने पुस्तक उपलब्ध करुन दिले.तसेच श्री ह.भ.प.संभाजी महाराज मठाधिपती मादळमोही संस्थान यांचे ही सहकार्य लाभले.नारायणगड संस्थान या सर्वांचे आभारी आहे.
श्री क्षेत्र नारायणगड संस्थानाचा प्रसार प्रचार हेतू इतरांनाही संकेतस्थळांस भेट देण्यास आवर्जुन सांगावे ही विनंती.

Images

त्यानंतर दि. १५ फेब्रुवारी २०१८ रोजी गडाचे Android Mobile App व अद्यावत वेबसाईट चे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व नारायणगडाचे मठाधिपती गुरुवर्य महंत शिवाजी महाराज , शिवसंग्राम चे राष्ट्रीय अध्यक्ष मा. आ . विनायकराव मेटे , मा. ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे , आ. लक्ष्मण पवार , आ. सुरेश धस, आ. भीमराव धोंडे, श्री सुभाष काशिद , गडाचे विश्वस्त श्री दिलीप अण्णा गोरे, संत तुकाराम महाराज संस्थान मादळमोही चे मठाधिपती गुरुवर्य महंत संभाजी महाराज यांच्या उपस्थितीत व सुमारे ३ लाख भाविकांच्या साक्षीने श्री क्षेत्र नारायणगड येथे झाले. यावेळी अभिमानाची बाब म्हणजे मा.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या facebook page आणि twitter या अधिकृत Social Media account वर या कार्यक्रमाचा फोटो share केल्यामुळे महाराष्ट्रातील लाखो भाविकानी त्याची दखल घेतली.