Images

वै. श्री महंत माणिक महाराज

माणिक महाराजाच जन्म कर्जत तालुक्यात सीना नदीच्या काठी असलेल्या सितपूर या गावी झाला. ते दुसरे महादेव महाराज यांचे धाकटे बंधू होते. माणिक महाराजांना त्यांच्या वडील बंधूचा अनुग्रह लाभला होता. तपश्यर्या पूर्ण झाल्यावर ते आपले गुरु महादेव महाराज यांचे जवळ गडावर येऊन राहिले आणि त्यांना गडाच्या कामात मदत करू लागले.

शके १८०७ साली महादेव महाराजांच्या वैकुंठ गमनानंतर ते गडाच्या गादीवर बसले आणि कारभार पाहू लागले. त्यावेळी एकदा बीड जवळच्या पालवण या गावचे ५-५० लोक महाराजांच्या दर्शनासाठी पायी चालत आलेले होते. वेळ दुपारची होती त्यामुळे सर्वांनाच सपाटून भुक लागल्या होत्या आता येथे जेवण मिळाले तर बरे होईल असे सर्वांना वाटू लागले. महाराजांनी लोकांची अंतरभावना जाणली ते उठून उभे राहिले आणि स्वयंपाक होत आहे असे सांगून वाड्यात गेले. थोड्या वेळाने बाहेर येउन सर्वाना जेवण्यास बोलावले.

गादीवर आल्यानंतर त्यांनी आपले गुरु महादेव महाराज यांच्या काळांत अपूर्ण राहिलेले स्वयंभू महादेव मंदिरावरील शिखराचे काम पूर्ण केले.पश्चिमेकडील राहता वाडा बांधला (२६) खन माडीचे बांधकाम पूर्ण केले. माडीच्या उत्तरेला तळघरासहकमानीचा वाडा बांधला. पश्चिमेकडील वाड्याचा अत्यंत शोभिवंत नक्षीदार दरवाजा बांधला त्यांच्या मध्यभागी एक लेख लिहिलेली शीळा बसवली आहे. ती आजही वाडयाच्या दक्षिण दरवाज्यावर वाचावयास मिळते.

माणिक महाराज स्वतः वेळ मिळेल तेव्हा मजुरा बरोबर अंग मेहनतीचे व कष्टाचे काम करीत असत.ते उत्तम समाज घडवण्याचे कार्य तर करीत असतच त्या बरोबर गोरगरिबांना आर्थिक मदत देखील करीत असत अनेक गरिबांच्या मुला मुलींची लग्ने महाराजांनी स्वखर्चाने केली.

असे हे महान भगवद भक्त थोर समाज सेवक व समाज प्रबोधक श्री. माणिक महाराज गडाच्या गादीवर (५२) बावन वर्ष होते. मित्ती जेष्ठ शु. १३ शालिवाहन शके १८५९ इसवी सन १९३७ या दिवशी त्यांनी आपली इहलोकीची यात्रा संपऊन शिवलोकी प्रयाण केले.