महत्वाची स्थळे

१ गंगाघाट: नारायण गडाच्या उत्तरेला पिण्याच्या पाण्याची एक विहीर आहे. ती गडावरील पाण्याची टंचाई दूर व्हावी म्हणून गोविंद महाराजांनी खोदली त्या विहिरीत प्रथम गंगेचे पाणी आणून टाकले होते. म्हणून त्यास गंगाघाट म्हणतात.तेथे दुसऱ्या महादेव महाराजांचे शिष्य श्री सिद्धेश्र्वर महाराज यांची समाधी आहे.

२ जुने धरण: गंगाघाटाच्या पूर्वेस हे धरण आहे. डोंगराचे दोन तुटलेले कडे बांधकामाने एकत्र जोडून हे तयार केले होते याचे बांधकाम नरसू महाराजांनी केले होते. त्यामुळे गडावरील जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची सोय झाली होती परंतु पुढे काही काळाने ते फुटले त्यांच्या साक्षी आज फक्त पडलेल्या भिंती आहेत.

३ मोती तलाव : हा तलाव खडकाळ जमिनीवर खोदलेला आहे त्यामुळे त्याचे पाणी पावसाळ्यात देखील गढूळ न होता मोठ्या प्रमाणे स्वच्छ असते म्हणून त्यास मोती तलाव म्हणतात. पूर्वीचे महाराज येथे कधी कधी वन भोजनासाठी येत असत.

४ भागीरथी : पूर्वी गोविंद महाराजाच्या काळात गडावर काशीचे पाणी आणले जाई. एकदा गडाच्या उत्तरेकडे अंदाजे एक किलोमीटर अंतरावर काशीच्या पाण्याच्या कावडीतील काही पाणी सांडले ते जमिनीवर आटून न जाता तसेच साचून राहिले हे जेव्हा गोविंद महाराजांनी पाहिले तेव्हा त्यांनी त्याठिकाणी एक कुंड खोदले आज ते एक पवित्र तीर्थ म्हणून समजले जाते दरवर्षी दसरयाच्या दिवशी या कुंडाची पूजा करून भागीरथीचे तीर्थ घेतले जाते.

५ गोपाळ तलाव: हा तलाव सोनुबाईच्या जवळ आहे. याचे खोदकाम नरसू महाराजांनी केले होते या ठिकाणी आसपासच्या गावातील गुराखी आपली जनावरे पाणी पाजण्यासाठी आणतात म्हणून त्यास गोपाळ तलाव म्हणतात.