Images

श्री. नगद नारायण महाराज समाधी

श्री. विठ्ठल रखुमाई मंदिराच्या समोर उत्तरे कडे तोंड करून जे मंदिर आहे. तेच श्री. नगद नारायण महाराज समाधी मंदिर होय. यात एक मोठी समाधी आहे त्यात मध्यभागी नगद नारायण महाराजाची, पश्चिमेस महादेव महाराजाची आणि पूर्वेस शेटीबा उर्फ दादासाहेब महाराज यांची अशा तीन समाध्यांची मिळून एकच समाधी बांधलेली आहे.

जर एखाधा भाविक भक्ताने श्रध्दा युक्त निष्ठेने अंत:करण पूर्वक प्रार्थना करून आपली प्रापंचिक अडचण दूर करण्याची विनंती नगद नारायण महाराजांना केली तर ती दूर होते असा अनेकांचा अनुभव आहे.
श्री. नगद नारायण महाराजांच्या समाधी मंदिराच्या पूर्वेस अनुक्रमे गोविंद महाराज, नरसू महाराज, महादेव महाराज (दुसरे), माणिक महाराज आणि महादेव महाराज (तिसरे) यांची लहान लहान समाधी मंदिर आहेत.
या सर्व देवस्थानाचे एकच मोठे विशाल मंदिर बाहेरून दिसते. ते सर्व हेमाडपंथी पध्दतीचे दगडी असून एकूण (४०) चाळीस खन बांधकाम झालेले आहे.