Images

स्वयंभू महादेव मंदिर

आज आपण श्री. क्षेत्र संस्थान नारायण गड येथे दर्शनास गेलो असता आपणास मंदिराच्या उत्तर बाजूस पूर्वेकडे तोंड असलेले जे महादेवाचे मंदिर दिसते तेच स्वयंभू महादेव मंदिर होय. यास स्वयंभू म्हणण्याचे कारण म्हणजे यातील शिवलिंगाची स्थापना कोणीही केलेली नसून ती आपोआप निर्माण झालेली आहेत.

हे मंदिर एका सहा गुणीले नऊ फुट आकाराच्या शिळे भोवती बांधण्यात आलेले आहे. याचा विशेष चमत्कार असा कि या शिळेवर दर बारा वर्षांनी एक नवीन शिवलिंग उदयास येते. पूर्वीच्या शिवलिंगांची वाढ होते. या शिळेवर आतापर्यंत एकूण छत्तीस ३६ शिवलिंगाची निर्मिती झाली असून त्या सर्वाची वाढ सुरु आहे. म्हणजेच हे देवस्थान चारसे बत्तीस (४३२) वर्षा पासून आहे निश्र्चित होते. दर वर्षी कार्तिक शु. १५ पौर्णिमेस येथे मोठी यात्रा भरते ती त्रिपुरारी पोर्णिमा असते त्या दिवशी भगवान शंकराने त्रिपुर नावाच्या दैत्याचा वध केला. त्या निमीत्ताने आनंद उत्सव म्हणून हि यात्रा भरते पुढे आठ दिवस सुरु असते.